Share

”गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा एसटीच्या विलीनीकरणासाठी गत दीड ते दोन महिन्यांपासून संप सुरु आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू केली मात्र कर्मचारी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीवर ठाम आहेत. यावरुन विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, ”गेंड्याच्या कातडीच हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत. दीड-दोन महिने होऊनही सरकार कर्मचाऱ्यांबाबत कुठलाच सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही. जर केंद्र सरकार कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता शेतकऱ्यांसाठी चार पावले मागे येऊन कृषी कायदा रद्द करु शकत असेल तर मग तुम्हांला कुठला अभिमान आलाय?” असा सवाल दरेकरांनी केला आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये दरेकर म्हणाले, ”सहकार मंत्री बाळासाहेब थोरात हे सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री आहेत, तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची सुख-दु:ख, समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. पण हे सत्तेच्या नादात इतके मशगुल आहेत की त्यांना गरीब कामगारांकडे पाहायला वेळ नाही. कष्टकरी जनताच सत्तेवर बसवते, तेव्हा त्यांचा शिव्या-शाप लागल्या तर सत्तेवरुन खाली यायला देखील वेळ लागणार नाही.” अशी टीका दरेकरांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!