🕒 1 min read
नाशिक : बंगळुरुतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात अनेक स्तरातून संतापाची लाट उसळली. त्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारची प्रतिक्रिया संतापजनक आहे. या प्रकरणावरुन कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक वक्तव्य केले आहे.
निवडणुकीआधी छत्रपतींचा आर्शिवाद म्हणून केलेल्या छत्रपतींचा आर्शिवाद अशी जाहिरातबाजी केली होती. त्याची अशा प्रकारे परतफेड केली का? असा संतप्त सावल सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.
बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर ‘छत्रपतींचा आशिर्वाद’ असे म्हणत जाहिरातबाजी केली. आता मात्र त्यांच्या सरकारला महाराजांचा विसर पडला आहे का? कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ”अजित पवारांनी त्यांचा राखीव सूट अमित शहांना देऊन महाराष्ट्राच्या संकृतीचे दर्शन दिले”
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
