Share

गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला- रुपाली चाकणकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील लोकप्रिय बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज हे कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करावे यासाठी बैलगाडा प्रेमींचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’मा.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे.बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत महाविकास आघाडीच्या माननीय खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरला,आणि आज हा आनंदाचा दिवस उजाडला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे.तसेच सर्व बैलगाडा मालक व गाडा शौकीनांचे मनःपूर्वक अभिनंदन.’

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’जय शिवराय,अतिशय आनंदाची बातमी शेअर करतोय, आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…होय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु करण्यास मंजूरी दिली आहे.’ तसेच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यावर आज मा. न्यायालयाने आज निकाल दिला. बैलगाडा मालक, शौकीन, बैलगाडा प्रेमी यांच्यासह मराठी माती आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या निकालाबद्दल मी तमाम बैलगाडा मालकांचे, शौकिनांचे, प्रेमींचे मनापासून अभिनंदन करतो. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिलजी केदार व राज्य सरकार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बैलगाडा शैर्यतीसंबंधी त्यांची भेट घेतल्यापासून माननीय पशुसंवर्धन मंत्री व महाराष्ट्र सरकारने मोठ्या तडफेने न्यायालयात बाजू मंडळी आणि त्यामुळेच आज हा निर्णय आपल्या बाजूने लागला आहे असे मी प्रामाणिकपणे नमूद करतो.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!