मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशी विश्वनाथ धामचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले, गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो असे सामना अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, कपाळास भस्म लावून राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील, पण राष्ट्र घडवता येणार नाही. असा टोलाही शिवसेनेने सामना अग्रलेखातून लगावला आहे.
देशातील मंदिरांचा विध्वंस मोगलांनी केला. काशी, मथुरा, अयोध्या या धार्मिक स्थळांवर आक्रमणे करून ती नष्ट केली. सोमनाथाचे मंदिरही तोडले. स्वातंत्र्यानंतर प्रथम सोमनाथाचा जीर्णोद्धार सरदार पटेल यांनी घडवून आणला. हिंदुस्थानातील धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास कोणी करत असेल तर त्यांचे कौतुक व्हायला हवे. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पाहायला हवे. काशीत विश्वनाथ धामचा विकास झाला. त्याचे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल. असे कौतुकही शिवसेनेने केलं आहे.
देशातील प्रत्येक गौरवशाली धार्मिक प्रतीके, ऐतिहासिक स्थळांचा जीर्णोद्धार अशा पद्धतीने व्हावा. पंतप्रधानांनी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे मनावर घेतले. महात्मा गांधींची तीच भावना होती. पण अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, कपाळास भस्म लावून राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील, पण राष्ट्र घडवता येणार नाही. मंदिरे किंवा धार्मिक स्थळे ही अध्यात्माची ऊर्जा केंद्रे आहेत. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य आहे. त्यामुळे फक्त ‘अफू’ वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. असा टोलाही सामनातून लगावला आहे. ज्या तत्परतेने काशीचा विकास घडवून आणला तीच तत्परता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवायला हवी. महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. मथुरेत मंदिरांचे आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम असल्याची टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद विभागातून आज धावल्या ४० बसेस; कर्मचारी संपावर ठाम
- राहुल गांधींची गळाभेट घेत राऊत म्हणाले, ‘आप आये बहार आयी’
- घटस्फोटानंतर १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृताशी बांधली गाठ; जाणून घ्या कोण आहे ‘तो’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
