🕒 1 min read
मुंबई : प्रेम कुणावरही होऊ शकतो, याचीच प्रचिती दाक्षिणात्य अभिनेत्री अमृता श्रीनिवासन (Amrita Srinivasan) हीच्या लव्हस्टोरी वाचून लक्षात येते. अमृताने तिच्यापेक्षा तब्बल १६ वर्षांनी मोठा असलेल्या व्यक्तीशी नुकतचं लग्न केलं आहे. तो दुसरा तिसरा कुणी नाही तर दाक्षिणात्य अभिनेता आणि कॉमेडियन कार्तिक कुमार (Southern actor and comedian Kartik Kumar )आहे. या दोघांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले असून चर्चेला उधाण आले आहे.
https://www.instagram.com/p/CXdXtXkPCNm/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram account) हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृता आणि कार्तिकच्या गळ्यात वरमाला दिसत आहे. तर त्या शिवाय अमृताने तिच्या श्वानासोबत असलेला कार्तिकचा फोटो शेअर केला आहे. अमृताने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. घटस्फोटानंतर कार्तिक कुमार आणि अमृता श्रीनिवासन यांनी नुकतेच त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहेत. कार्तिक आणि अमृता हे दोघेही डिजीटल क्रिएटर आहेत. त्या दोघांना अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CXZCWgDvkMc/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी कार्तिक कुमारने पार्श्वगायक आणि आरजे सुचित्रासोबत लग्न केले होते. काही वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. याशिवाय कार्तिक कुमार ‘कांडा नाल मुधल’, ‘यारादी नी मोहिनी’, ‘वनम वसप्पादुम’, ‘मनर वगैयरा’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर अमृता श्रीनिवासन ‘मयधा मान’ आणि ‘देव’ सारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अकोल्यात विश्वासाला तडा, पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही’
- राज ठाकरेंनी सांगितला एसटी संपावर ‘हा’ उपाय
- कामं आम्ही करायची आणि मत मात्र दुसऱ्याला; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- मोठी बातमी! मला कोणीच वसूली करण्याचे आदेश दिले नव्हते; सचिन वाझेचा गौप्यस्फोट
- …म्हणून सारखे पेपर फुटतात; राज ठाकरेंनी सांगितलं पेपरफूटीचं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
