🕒 1 min read
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 खासदारांना पूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याची कारवाई लोकसभा अध्यक्षांनी केली होती. त्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सरकारचा निषेध करत आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या आंदोलक खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती.
आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निलंबित आंदोलक खासदारांची भेट घेतली. राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी संसदेबाहेर जमत मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी आंदोलनस्थळी पोहोचले असता खासदार संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची गळाभेट
म्हणाले, आप आये बहार आयी@rautsanjay61 @RahulGandhi @ShivSena @priyankac19 @INCMaharashtra @INCIndia pic.twitter.com/2jBR1eZCb3— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 14, 2021
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, राहुल गांधी निलंबित खासदारांकडे जाताना दिसत आहेत. यावेळी संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. संजय राऊत यांनी राहुल गांधींना मिठी मारली आणि म्हणले, ‘आप आए बहार आयी’ त्यानंतर राहुल गांधी यांनी संजय राऊत, अधिर रंजन चौधरी यांच्यासोबत फोटो काढले. दरम्यान, संजय राऊत आणि राहुल गांधींच्या या भेटीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
- ‘अकोल्यात विश्वासाला तडा, पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही’
- राज ठाकरेंनी सांगितला एसटी संपावर ‘हा’ उपाय
- कामं आम्ही करायची आणि मत मात्र दुसऱ्याला; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- मोठी बातमी! मला कोणीच वसूली करण्याचे आदेश दिले नव्हते; सचिन वाझेचा गौप्यस्फोट
- …म्हणून सारखे पेपर फुटतात; राज ठाकरेंनी सांगितलं पेपरफूटीचं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
