Share

औरंगाबाद विभागातून आज धावल्या ४० बसेस; कर्मचारी संपावर ठाम

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस वाढतच आहे. रुजू झालेल्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर एसटी धावत आहे. आज औरंगाबाद विभागातून ४० बसेस धावल्या. ४० बसेसच्या ५९ फेऱ्या झाल्या. तर ११८५ प्रवाशांनी जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड जालना यांसह इतर ठिकाणी प्रवास केला.

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. अद्यापही हा संप सुरूच आहे. औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत ६१ कर्मचारी रुजू झालेले आहेत. मात्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनाला कर्मचाऱ्यांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी कडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून त्यानंतरच योग्य ते निर्णय घेतला मंगळवारी (दि.१३) औरंगाबाद-पुणे मार्गावर पंधरा खासगी शिवशाही चालवण्यात आल्या.

आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर आठ बसने सोळा फेऱ्या करण्यात आल्या. यात ५६४ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर २ बसने ४ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ६ शिवशाही बसच्या ६ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या रुजू झालेला नाही. तर सिडको बकेल्या. एकुण ४० बसने ५९ फेऱ्या केल्या असून ११८५ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बसस्थानकात एकही नवा कर्मचारी आज रुजू झालेला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!