औरंगाबाद: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी अनेक विषयांना हात घातला तसेच पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आहेत. राज्यात सध्या परीक्षांमध्ये मोठा गोंधळ होताना दिसत आहे. आरोग्य भरतीची परीक्षा असो नाहीतर म्हाडाची असो, यात पेपरफूटी प्रकरण समोर आले आहे.या संदर्भात देखील ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळा नंतर आता म्हाडाच्या परीक्षेतही गोंधळ झाल्याचे समोर आले. रविवारी दिनांक १२ डिसेंबर रोजी म्हाडाचा पेपर होणार होता. मात्र पेपर फुटल्याचा संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन एजंट बुलढाण्याचे तर एक जण पुण्यातील आरोपी असल्याचं समोर आलं आहे.
या सर्व प्रकरणावर राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरे म्हणाले, कसं आहे की पेपर काही पहिल्यांदाच फुटलाय असं नाहीये. आतापर्यंत अनेकदा फुटला आहे पेपर. पण ज्याने पेपर फोडला ते फुटले जात नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात. ज्या प्रकारचा वचक शासन म्हणून असायला हवा तो राहत नाहीये, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
- महाविकास आघाडी सरकारबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्यं
- ‘पंतप्रधानांनी औरंगजेबाचा उल्लेख करत ‘त्या’ शक्तींना योग्य तो संदेश दिला’
- औरंगाबाद मनसेत खळबळ; जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथेंना पदावरुन काढले..!
- ‘ही’ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवाच; चंद्रकांत पाटलांचं मविआला ओपन चॅलेंज
- असा घोडेबाजार होणे हे…; नाना पटोलेंचा भाजपवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
