🕒 1 min read
मुंबई : आरोग्य भरती घोटाळा, पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर १२ डिसें.रोजी राज्यातील म्हाडाच्या परिक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. म्हाडा परिक्षा रद्द झाली असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी मध्यरात्री २ वाजता केली होती. असे असतांना म्हाडा भरती परीक्षेची प्रक्रिया आता पूर्णपणे म्हाडाकडून राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीची निवड करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्र्यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’म्हाडाची भरती प्रक्रिया ‘टीसीएस’च्या मदतीने करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्र्यांनी केली आहे.’तसेच बूंद से गईं सो हौद से नही आती, असे ते म्हणाले आहेत.
म्हाडाची भरती प्रक्रिया ‘टीसीएस’च्या मदतीने करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्र्यांनी केली आहे.
बूंद से गईं सो हौद से नही आती। pic.twitter.com/4LEOuKhKZy— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 14, 2021
दरम्यान, यापूर्वी ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ कंपनीला म्हाडा भरतीचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु, या कंपनीने पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर याप्रकरणी कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली. या गैरप्रकारानंतर परीक्षार्थींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच आता यापुढे भरती परीक्षा म्हाडाच्या माध्यमातूनच घेण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- …हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे- संजय राऊत
- ‘अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण’
- ‘मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेणार नाही’
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
