🕒 1 min read
मुंबई : बेळगाव प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी(Deepak Dalavi) यांच्या अंगावर शाई फेकल्याने येथील मराठी जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेणार नाही, असे म्हंटले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 13, 2021
यासंदर्भात अजित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. मराठी भाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पध्दतीनं करण्यात आलं असावं. मात्र अशा घटनांमुळे मराठी भाषक आंदोलनावर, चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे. त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल; तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.’
लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे. त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल; तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 13, 2021
दरम्यान, काल(१३ डिसें.)बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती प्रत्येक वेळी महामेळावा भरवते. यंदाही या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. परंतु,यावेळी अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या काही लोकांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे बेळगावचे वातावरण चांगलेच चिघळल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच या घटनेचा निषेध म्हणून आज(१४ डिसें.) बेळगाव बंदचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- …हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे- संजय राऊत
- ‘अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण’
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
