Share

कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कतरिना आणि विकीने (Actress Katrina Kaif and Vicky Kaushal ) त्यांच्या लग्नातील हळदीचे आणि संगीत कार्यक्रमातील काही फोटो नुकतेच शेअर केले. त्यानंतर आता कतरिनाच्या बहीण आणि भावाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहे. फोटोत असलेल्या एका मराठी अभिनेत्रींने कतरिनाच्या भावाचं काळीज चोरलं असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान कतरिनाच्या लग्नानंतर तिचे भावंड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल (Sebastien Laurent Michel) ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मेंहदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये सेबॅस्टियनने शेअर केलेल्या फोटोत कतरिनाही बहीण इसाबेल (Isabel) आणि अभिनेत्री शर्वरी वाघसोबत (Actress Sharwari Wagh) दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘माझं खरोखरच सुंदर कुटुंब आहे, फक्त बाहेरून नाही तर आतूनही सुंदर आहे. मी गेल्या जन्मात काही पुण्य केले असणार म्हणून मला हे कुटुंब मिळालं असणार…आणि शर्वरी खूप सुंदर आणि मस्त आहे, असे तो म्हणाला.

https://www.instagram.com/p/CXYKtpGMgLh/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री शर्वरी ही ज्येष्ठ शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून मुलगी नम्रता वाघची कन्या आहे. शर्वरी ‘बंटी और बबली २’ (Bunty Aur Babli 2) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी याच्यासोबत दिसली आहे. मात्र नुकतंच कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियनने शेअर केलेल्या फोटोमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!