🕒 1 min read
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. याच दरम्यान त्यांना, ‘आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरेंनी दिलेल्या प्रश्नावर जोरदार हशा पिकला.
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असणा का हे मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचे उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना का हा प्रश्न विचारला नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? त्यांच्या घरी पोर होईल का नाही हे मी का सांगू? अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी देताच पत्रकार परिषदेमध्ये चांगलाच हशा पिकला.
दरम्यान, तुमच्या हातात लोकांसाठी राज्य दिले आहे. आरेरावीची भाषा करण्यासाठी नाही. कर्मचाऱ्यांना समजून घेणे गरजेचे आहे. शिवाय, या महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांनी बोलायला हव्यात. चार-चार महिने कामगारांना पगार मिळत नाहीत हे काय आहे? जे कर्मचाऱ्यांना बोलत आहेत त्यांच्या घरी भ्रष्टाचाराचे पैसे आले नाही तर यांचा जीव कासावीस होतो आणि कामगारांची दिवाळी पगाराविना गेली. अशा परिस्थितीत कामगार असताना तुम्ही अरेरावीची भाषा करताच कशी?, असा संतापही राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’
- जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा; औरंगाबादेत अभाविप आक्रमक!
- …त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको- अतुल भातखळकर
- महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना फासले काळे; कार्यकर्त्यांकडून उद्या बेळगाव बंदची हाक
- सारा अली खान, जान्हवी कपूर, सारा तेंडूलकर यांना नाईट पार्टी पडली महागात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
