🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट म्हणजेच ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने पसरत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे. त्याचवेळी ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहरात मिरवणूक, रॅली आणि मोर्चाला बंदी घातली आहे. दरम्यान, काल रात्री मुंबईतच प्रसिद्ध गायक आणि रॅपर एपी ढ़िल्लों चा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता तेथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने, आता मुंबई पोलिसांनी कोविड नियमांचे पालन न केल्याबद्दल आयोजकावर एफआयआर नोंदवला आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर आणि इब्राहिम अली खान यांनीही याच कॉन्सर्टमध्ये हजेरी लावल्याचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. या कॉन्सर्टमध्ये त्याच्याशिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते तसेच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा देखील स्पॉट झाली होती.
ओमिक्रॉनची संसर्ग साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत सावधगिरी बाळगली असून रॅली आणि गर्दीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत दोन दिवस मेळावे आणि रॅली बंद करण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम फक्त शरद पवारच करु शकतात’
- सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही- संजय राऊत
- शरद पवार पक्ष स्थापनेपासून पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहेत- देवेंद्र फडणवीस
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
