Share

पेपरफुटी प्रकरणी अभाविप आक्रमक; जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : म्हाडा भरतीची परिक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता राजकारण चांगलेच तापू लागले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. अभाविपच्या या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली यामुळे परीक्षार्थीं संतापले आहेत. अचानकपणे रद्द झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना होती. परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरून अनेक विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला होता.

अभाविपने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भ्रष्टाचार केला असल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आव्हाड पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत असल्याची आरोप अभाविपने केला आहे.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला ६ आरोपींना पकडण्यात यश आले असून या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता(Amitabh Gupta) यांनी माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!