🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड महानायक म्हणून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लोकप्रिय आहेत. त्याच बरोबर अभिषेक बच्चन (Actor Abhishek Bachchan) हा देखील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतो. सोशल मीडियावर (social media) फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
दरम्यान अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिषेकने अमिताभसोबतचे काही फोटो कोलाज करून शेअर केले आहेत. यात अभिषेक हा अमिताभ यांच्या सारख्या काही गोष्टी करत असल्याचे दिसते. या फोटोंमध्ये अमिताभ आणि अभिषेक हुबेहुबे दिसत आहेत. हा फोटो शेअर करत वडिलांसारखाच मुलगा! माझी प्रेरणा, असे कॅप्शन अभिषेकने दिले आहे. त्याच्या चाहत्यांनी त्या दोघांमध्ये साम्य असल्याचे म्हटले आहे.’ तसेच sorry तू तुझ्या वडिलांप्रमाणे नाहीस, ते अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत, असे म्हणत ट्रोल ही केले आहे.
https://www.instagram.com/p/CXaB6DQoJiJ/?utm_source=ig_web_copy_link
त्याचप्रमाणे कमेंटद्वारे ‘तू आणि अमिताभ सर सारखा दिसतोस, जरी तुमच्या यशाचे प्रमाण हे कमी जास्त असले आणि ट्रोलर्स तुमच्यात तुलना करत असले तरी तुमच्या कुटुंबात असलेले चांगले संबंध पाहून खरोखर आनंद होतो.’, ‘त्यांनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच यश मिळवले होते, परंतु तुला ते आता मिळेल.’ असे म्हणत ट्रोल केले जात आहे. अभिषेक बच्चन सध्या ‘बॉब बिस्वास’ (film Bob Biswas) या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असून त्यावर देखील चाहत्यांनी कमेंट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम फक्त शरद पवारच करु शकतात’
- सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही- संजय राऊत
- शरद पवार पक्ष स्थापनेपासून पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहेत- देवेंद्र फडणवीस
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
