Share

…ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना- चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसने आपला उमेदवार बदलला. डॉ. रवींद्र भोयर(Ravindra Bhoyar) यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख(Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी भाष्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बावनकुळे म्हणाले की,’नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण ते आता हतबल झाले असून काँग्रेसला न्याय देऊ शकणार नाही. दोन मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र काँग्रेसला आपला निर्णय बदलावा लागला हे अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे. काँग्रेसच्याच दोन मंत्र्यांनी दबाव टाकल्याने नाना पटोलेंनी उमेदवार बदलला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पक्षाच्या मंत्र्यांवरच त्यांचे नियंत्रण नाही.’ तसेच ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना आहे, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जर ते मंत्र्याच्या दबावाखाली काम करणारे असतील तर ते प्रदेशाध्यक्ष बनण्याच्या लायकीचे नाही. १३ दिवसांच्या प्रचारानंतरही उमेदवार बदलावा लागतो यापेक्षा नामुष्की आणि शरमेची बाब कोणतीही नाही. असा हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला न्याय देऊ शकत नाही. मंत्र्यांवर कारवाई करायची की नाही हा काँग्रेसचा निर्णय आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसची वाट लागणार आहे’, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!