🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पवारांच्या मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
पुस्तकाच्या प्रकाशन समारोह पार पडला. या कार्यक्रमामध्ये चांगलीच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली आहे. सुधीर भोंगळेंनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi)ना टोला लगावला आहे.
नेते शरद पवार (Sharad Pawar) ‘नेमकचि बोलणें’ पुस्तक नरेंद्र मोदींना पाठवलं पाहिजे. नेमके बोलणें याची फोड करून त्यांना सांगू, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र देशाला सतत विचार देत असतो. शरद पवार नेहमी देशाला विचार देत असतात, असेही राऊत म्हणाले आहेत.
तुमच्या विचाराला भगवे कव्हर घातले आहे. हे सरकार बेरंग नाही. अवघा रंग एक झाला. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आपण निर्माण केला, त्याला आपण भगवं कव्हर घातलं आहे. मी शरद पवारांना बसायला खुर्ची का दिली यावर टीका करणाऱ्यांनी शरद पवार यांची 61 भाषणे वाचली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, भाजपला देशाचे ऐक्य नको हे शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला 2 वर्षापूर्वी कळलं. आम्हाला हे कळालं आहे की भाजप देशाला किती मागे नेतोय हे त्यांनी 1996 च्या आसपास सांगितलं. प्रश्न विचारणाऱ्यांची काय अवस्था आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण पवार साहेबांना प्रश्न विचारलेले आवडतात. उत्तर शोधायला त्यांना आवडतात. अनेक वर्षांपूर्वी भाजपला देश एकसंघ नको हे पवार यांनी सांगितलं, हे आत्ता आम्हाला आता समजलं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना- चंद्रशेखर बावनकुळे
- ‘हे बाळ त्याचं नाही तर…’ ; कॉमेडियन भारती सिंहने केला खुलासा
- ‘भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सहज जिंकेल
- देशाच्या CDS प्रमुख पदासाठी महाराष्ट्राचे भूमीपुत्र मनोज नरवणे मजबूत दावेदार
- शरद पवारांनी सांगितला नावं लक्षात ठेवयाचा भन्नाट किस्सा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
