Share

शरद पवारांनी सांगितला नावं लक्षात ठेवयाचा भन्नाट किस्सा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर पवारांच्या मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांच्या भाषणांचा काही भाग वाचण्यात आला. त्याच सोबत त्या संदर्भातील काही प्रश्न देखील पवार यांना विचारण्यात आले. अभिनेते व कवी किशोर कदम यांनी देखील पवार यांच्या बद्दलच्या काही आठवणी सांगितल्या त्याच सोबत सर्वांनाच पडणार प्रश्न किशोर कदम यांनी शरद पवारांना विचारला आणि त्यावर पवारांनी एक भन्नाट किस्साच सांगितला.

अभिनेते किशोर कदम (Kishor Kadam) यांनी विचारलेला प्रश्न असा होता की, शरद पवार सर्वांना नावानिशी कसे ओळखतात. यावर पवार यांनी किस्सा सांगितला. राजकारणात फार कमी कष्टानं आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळतं, फक्त तुम्ही समोरच्या माणसाचं नाव लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातली होती. तिचं काहीतरी काम होतं. मी तिला म्हटलं, काय गं कुसूम मुंबईला कशी, काय चाललंय? तर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली काम होवो न होवो, अशी तिची भावना होती. लोकांचं खूप छोट्या गोष्टीत सुख असतं. या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवारांनी हा किस्सा सांगताना यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांची आठवान काढली. त्यांच्याविषयी बोलताना पवार म्हणाले, अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) आणि दुसरे वसंतदादा पाटील (Vasantdada Patil). या दोघांनाही कितीही जुना माणूस भेटला तरी ते नाव लक्षात ठेवायचे. या गुणामुळं समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त व्हायचं यश मिळतं, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!