नवी दिल्ली : भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वी, अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) ने यावेळी टीम इंडिया मालिका जिंकेल, असे भाकीत केले आहे. विराट कोहली (Virat Kohli) ला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असा विश्वासही व्यक्त केला आह्रे. त्याच्या मते आफ्रिकन संघ आता पूर्वीसारखा मजबूत राहिलेला नाही. त्यामुळे भारताला मालिका जिंकण्यात अडचण येणार नाही.
2001 आणि 2010 मध्ये भारतीय कसोटी संघासोबत दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणाऱ्या हरभजन सिंगने कबूल केले की यजमान संघ पूर्वीसारखे मजबूत नाहीत. हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘मला विश्वास आहे की भारतासाठी दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यांचा संघ पाहिला तर तो पूर्वीसारखा मजबूत नाही.
हरभजन पुढे म्हणाला, ‘गेल्या दौऱ्यात एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डू प्लेसिससारख्या खेळाडूंनी भारताला तिथे कधीही विजय मिळवू दिला नाही. मात्र, भारताने तेथे चांगला खेळ केला. पण त्यांनी कधीही मालिका जिंकलेली नाही. यावेळी मात्र भारताकडे ही मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे.
दक्षिण आफ्रिकेत भारताचा विक्रम
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 7 मालिका खेळल्या आहेत. या काळात एकही मालिका जिंकलेली नाही.
2010 मध्ये भारताने चांगली कामगिरी केली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारताने आतापर्यंत तीन कसोटी सामने जिंकले आहेत. 10 पराभव आणि सात अनिर्णित राहिले आहेत.
मागील मालिकेबद्दल बोलायचे झाले तर 2018 मध्ये भारतीय संघ 2-1 असा पराभूत झाला होता.
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (डब्ल्यूके), रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या
- आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या…
- समीर वानखेडेंनी केली कामाला सुरुवात; ‘या’ ठिकाणी टाकली धाड
- ‘द्रविडची प्रशिक्षकपदी निवड झाली तेव्हाच विराटला कर्णधारपदावरून हटवणार हे निश्चित होतं
- मुलाच्या आठवणीत शिखर धवनने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
- ‘एसटी संप चिघळवून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

