Share

मलिकांच्या ‘त्या’ ट्विटवर केशव उपाध्येंचा खोचक टोला; म्हणाले,’स्वतःच्या पक्षाशी…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) हे पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. मलिकांनी आपल्या घरी इडी अथवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचे सूचक ट्वीट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’मित्रांनो, मी ऐकले आहे की आज माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, आम्हाला घाबरायचे नाही, लढायचे आहे. गांधी गोर्‍यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू’, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, मलिकांच्या या ट्विटवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी खोचक टोला लगावला आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, नवाब मलिक भाई तुमचा लढा म्हणजे पुरावे न देता आरोप करणे, पब्लिसिटी स्टंट करणे आणि न्यायालयात माफी मागणे. तसेच चोरांशी लढण्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्याच पक्षाशी कसे लढणार?, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!