🕒 1 min read
नवी दिल्ली : एकदिवसीय आणि टी-20 चा नवा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबत नवा खुलासा झाला आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा रोहित शर्माला टी-20 टीमचा कर्णधार बनवण्यात आलं तेव्हा त्याला वनडे टीमचं कॅप्टन बनवायचं होतं. रोहित शर्माला फक्त एका मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचा कर्णधार व्हायचे नव्हते.
विराट कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोहलीने याआधीच टी-20 चे कर्णधारपद सोडले होते आणि आता त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले असून रोहित शर्मा आता टी-20 तसेच वनडेच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
रोहित शर्माने वनडेतही कर्णधारपदाची मागणी केली होती.
प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा केवळ टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधारपदासाठी तयार नव्हता. त्याला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवावा, अशी मागणी त्याने निवड समितीसमोर ठेवली होती. रोहित शर्माने सांगितले होते की, त्याला टी-२० सोबत वनडेचे कर्णधार बनवले तरच तो नेतृत्वाची भूमिका स्वीकारेल.
रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याआधीपासूनच ही अटकळ बांधली जात होती आणि आता त्याला अधिकृतपणे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्णधारपदावरून हटवण्याबाबत विराट कोहलीच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, टी-२० आणि वनडेचा कर्णधार वेगळा असू शकत नाही. त्यामुळे रोहित शर्माकडे संपूर्ण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटची जबाबदारी देण्यात आली आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, त्याने स्वतः विराट कोहलीशी याबद्दल बोलले होते.
महत्वाच्या बातम्या
- निवडणुकांमधील पराभवाच्या भितीमुळेच सरकारने माघार घेतली- संजय राऊत
- आपण काय बोलतो याचं जरा भान ठेवलं पाहिजे; अजित पवारांचा आशिष शेलारांना टोला
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
