Share

आपण काय बोलतो याचं जरा भान ठेवलं पाहिजे; अजित पवारांचा आशिष शेलारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती, असे किशोरी पेडणेकर यांचे म्हणणे होते आणि याच टीकेमुळे पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावरुन सेना-भाजपमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील अशिष शेलारांना सल्ला दिला आहे.

मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत काय वक्तव्य केलं हे आपण सर्वांनी पाहिलेच. ते काय झाकून नाही टिव्हीवरही दिसले. शेवटी आपल्याकडे परंपरा आहे आपण महिलांचा आदर करतो. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो. त्यांनी प्रथम नागरिक म्हणून त्यांनी तक्रार केली. तर लगेच राजकारण म्हणतात. ते तसं नाही. आशिष शेलारांना महापौरांबाबतचे ते वक्तव्य टाळता आले असते. प्रत्येकाने आपण काय बोलतो याचे तारतम्य ठेवावे, असा सल्ला अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना आशिष शेलारांना दिला आहे.

वरळीतील बीडीडी चाळीत झालेल्या सिलेंडर स्फोट दुर्घटनेतील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला. या घटनेवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत तीव्र संताप व्यक्त केला होता. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला त्यांनी धारेवर धरले होते.

यावेळी टीका करताना आशिष शेलार यांनी महापौरांबद्दल अश्लील व्यक्तव्य केले होते. याची तक्रार महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. तक्रार देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी रात्री मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!