Share

झूम मिटिंगमध्ये 900 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढणारे CEO विशाल गर्ग सक्तीच्या रजेवर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: बेटर डॉट कॉम (Better.com) चे चीफ सीइओ विशाल गर्ग (Vishal Garg) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. सध्या विशाल गर्ग एका वेगळ्याच कारणाने चर्चेत होते. मात्र आता त्यांना मोठा झटकाच कंपनीने दिला आहे.

दरम्यान बेटर डॉट कॉम या कंपनीनं आपल्या 900 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांना मोठा धक्का दिला होता. वार्षिक सुट्ट्यांच्या अगोदर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग यांनी काही कर्मचाऱ्यांची झूम मिटींग घेतली.त्यांनी 1 डिसेंबर 2021 रोजी कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. ‘आत्ता यावेळी झूम कॉलवर उपस्थित असलेले लोक दुर्दैवी आहेत. त्यांना तत्काळ नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. नोकरी गेल्यानंतर तुम्हाला कुठले आर्थिक लाभ मिळतील याबाबत लवकरच एचआरकडून ईमेल मिळेल’, अशा शब्दांत गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याची माहिती दिली. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात होती.

दरम्यान आता कंपनीने विशाल गर्ग यांनाच सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. कंपनीचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर केव्हिन रेयान (CFO Kevin Ryan)आता कंपनीची दररोजचे निर्णय घेतील आणि बोर्डाकडे रिपोर्ट करतील. आता विशाल गर्ग यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!