Share

द. आफ्रिका दौऱ्यासाठी उपकर्णधार रोहितची जोरदार तयारी सुरू; पाहा सरावाचा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विश्रांती दिल्यानंतर रोहितचे लक्ष आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आहे.

रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवरून फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर भरपूर उसळी मिळत असल्याने आणि चेंडू हलकेच स्विंग होत असल्याने संघाचा नवा उपकर्णधार रोहित शर्मा त्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

बुधवारी रोहित शर्माला कसोटी संघाचा नवा उपकर्णधार बनवण्यात आले. त्याचवेळी वनडे संघाची कमानही रोहितकडे सोपवण्यात आली. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 18 जणांचा संघ जाहीर केला आहे. भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना 26 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (डब्ल्यूके), रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!