Share

नाशिकमधील पहिली ते सातवीच्या शाळा उघडणार ‘या’ तारखेपासून

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा आता दीर्घ प्रतीक्षेनंतर उघडणार आहेत. १३ डिसेंबरपासून नाशिकमधील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या महापालिका आयुक्त आणि महापालिका शिक्षण विभागाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान या बैठकीनंतर शाळा भरविण्याबाबतचे सर्व नियम संबंधित शाळांपर्यंत पोहोचविल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार १ डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र स्थानिक परिस्थितीची पाहणी करून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आला होता. त्यानुसार नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव (Nashik Municipal Commissioner Kailas Jadhav)यांनी येत्या १३ डिसेंबरपासून शाळा उघडणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या सूचनेनुसार शहरातील शाळांकडून माहिती मागविली होती. ६१ टक्के शाळांनी पालकांच्या सहमतीसह शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती पाठविली आहे. तर बहुतांश शाळांची तयारी पूर्ण झाली असून, उर्वरित शाळांना येत्या तीन दिवसांत सॅनिटायझेशनसह सर्व नियोजन करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!