🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गुरुवारी लोकसभेत केली होती. यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
याबाबत केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे. उपाध्ये म्हणाले, ‘सुप्रिया सुळे ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू.’ असा खोचक सल्ला उपाध्ये यांनी सुप्रिया सुळेंना दिला आहे.
@supriya_sule ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट @AjitPawarSpeaks यांना द्या. ते तुमच तरी ऐकतात का पाहू pic.twitter.com/MQnJxhFG3b
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 10, 2021
लोकसभेत शून्य प्रहराला गरजेच्या वस्तूंची भाववाढ आणि महागाई या विषयावरील चर्चेमध्ये सुळे यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. खाद्यतेलाचे भावही गगनाला भिडले असून सर्वसामान्यांना ते परवडेनासे झाले आहेत. सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसवरील कर कमी करावे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
