🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शहरात दाखल होताच ‘जय मराठा, जय बांग्ला’चा नारा देत शिवसेनेशी राजकीय सहकार्याचे संकेत दिले. मुंबईत दाखल झालेल्या ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे भेट घेणं शक्य झालं नाही. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून आणि राष्ट्रीय राजकारणत सक्रीय व्हावेत यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केली, असं ममता बॅनर्जींनी सांगितल्याची माहीती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ममतादीदींची भेट घेतली. ‘बंगालची वाघीण ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत शासकीय कामासाठी दौरा असला तरी आल्यावर त्या ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. आदित्य ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायचं होतं, पण अजूनही त्यांना बायो बबलमध्ये ठेवण्यात आलं असल्याने भेट टाळली. आदित्य ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटवस्तू देण्यात आल्या. राजकीय चर्चा पार पडली, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रकारे भाजप ईडी, सीबीय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून दहशतवाद निर्माण करत आहेत, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशाच प्रकारचं महान कार्य हे भाजपाचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना पुरुन उरलो आहोत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा या सरकारी दहशतवाद्यांचा सामना करेल, अशी खात्री असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- संसदभवन परिसरातील आंदोलक खासदारांना जया बच्चन यांनी वाटले चॉकलेट, पापड
- कोरोना म्हणजे फर्जीवाडा; कालीचरण महाराजांनी उधळली मुक्ताफळे
- ‘चैत्यभूमीवर यंदाही प्रवेश बंदी केली, दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध’
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
- ममता बॅनर्जी-शरद पवार यांची आज भेट; तृणमूल महाराष्ट्र भाजपाला देणार आव्हान?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
