नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (parliament winter session) आज तिसरा दिवस आहे आणि लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये तुफान गोंधळ सुरू आहे. आजही विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाबाबत संसदेच्या आवारात विरोधकांचे जोरदार निदर्शने सुरू आहेत.
खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संसद भवन परिसरामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. तीन पक्ष आता लोकसभेतून बाहेर पडली आहेत. सोमवारी शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यावरुन हा मोठा वाद सुरु झाला आहे. तीन्ही पक्षांच्या खासदारांनी आता संसद भवन परिसरामध्ये निदर्शने सुरु आहेत.
सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संसदेच्या संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी खसदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी संसद भवनाच्या परिसरात आंदोलन करणाऱ्या खासदारांना चॉकलेट टॉफी आणि आंब्याचे पापड दिले आहेत. यामुळे त्यांना आंदोलन करताना बळ मिळेल, असे जया बच्चन म्हणाल्या आहेत.
अशाप्रकारे बच्चन यांनी आंदोलनाला त्यांचा पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Shivsena Priyanka Chaturvedi) यांनी काल निदर्शनास आणून दिले होते की, नियम 256 नुसार खासदारांचे निलंबन त्याच संसदेच्या अधिवेशनात केले जाऊ शकते. संसदेच्या पुढील अधिवेशनात होणारी ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना म्हणजे फर्जीवाडा; कालीचरण महाराजांनी उधळली मुक्ताफळे
- ‘चैत्यभूमीवर यंदाही प्रवेश बंदी केली, दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध’
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
- ममता बॅनर्जी-शरद पवार यांची आज भेट; तृणमूल महाराष्ट्र भाजपाला देणार आव्हान?
- ‘हा घ्या पुरावा, हिंदूंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारे हिंदूह्रदयसम्राटांचे वारस’


