🕒 1 min read
सांगली : सांगली येथिल कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी आता नवीन ज्ञान पाजळलं असून कोरोना म्हणजे फर्जीवाडा असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. इतकचं नव्हे तर कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले नाहीत तर डॉक्टरांनीच लोकांना मारले आहे. त्यांच्या किडनी आणि अवयवांची तस्करी केली आहे, असा शोधही कालीचरण महाराजांनी लावला आहे.
कोरोना हे एक षडयंत्र आहे. तो फर्जीवाडा आहे. इतकेच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनाही फर्जीवाडा आहे, असा छातीठोक दावा कालीचरण महाराजांनी केला आहे. ‘जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी सुद्धा फर्जी आहेत. करोना ही भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी मारले आहे. त्यांच्या शरीरातील किडनी आणि मानवी अवयवांची तस्करी झाली आहे, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे लसीच्या कंपन्यासोबत संगणमत आहे. अमुक एक लस विकली गेली पाहिजे म्हणून ते भीती उत्पन्न करतात. लोकांना मारणे सुरू आहे. त्यांचे मृतदेह लपेटून टाकून दिले जात आहेत. त्यांच्या किडन्या काढल्या, हार्ट काढले, डोळे काढले काय माहित. लोकांना मारून फेकत आहेत. पुढचे सत्तर-ऐंशी वर्ष मजा करून घ्या. त्यानंतर हे लोक बारा हजार वर्षे नरकात सडतील, असा दावाही कालीचरण महाराजांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एक तालुका, एक शहर सांभाळता येत नाही अन् म्हणे पंतप्रधान पदाचे दावेदार’
- ‘आमचा कोणताही घोटाळा बाहेर काढून दाखवावा, त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’
- ‘चैत्यभूमीवर यंदाही प्रवेश बंदी केली, दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध’
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
- ममता बॅनर्जी-शरद पवार यांची आज भेट; तृणमूल महाराष्ट्र भाजपाला देणार आव्हान?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
