Share

चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात वेगाने राजकीय हालचाली सुरु होत्या. विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भल्या पहाटे शपथविधी घेत सरकार स्थापन केलं. मात्र ते सरकार 80 तासांतच कोसळलं. या पहाटेच्या शपथविधीला आज बरोबर 2 वर्षे पूर्ण झाली. आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा महाविकास आघाडी सरकार कोसळणार आणि भाजपचं सरकार स्थापन होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. तर त्यांच्या या वक्तव्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांना खोचक सल्ला दिला आहे. ‘नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतेक त्याच शपथविधीचे झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत. म्हणून ते सारखं म्हणत आहेत की सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, एवढंच मी त्यांना सांगेन, असा टोलाही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!