मुंबई : मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला चक्क ताजमहलासारखे (Taj Mahal)दिसणारे घर प्रेमाची निशाणी म्हणून भेट दिले आहे. या घरास पूर्ण करण्यास तब्बल तीन वर्षाचा कालावधील लागला असून ही अनोखी भेट पाहून वाह ताज! अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे.
दरम्यान आग्रा येथील प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाप्रमाणेच शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चौकसे (Anand Chokse )यांनी आपले घर बनवले आहे. त्यांनी पत्नी मंजुषा चोकसे (Manjusha Chokse )यांना हे सुंदर 4 बेडरूमचे घर भेट दिले आहे. ब-हाणपूर मधून जाणाऱ्या तापी नदीच्या काठावर ताजमहाल बांधला जाणार होता, असं म्हटलं जातं. मात्र काही कारणांमुळे ते आग्रा येथे बांधले गेले. याबाबत आनंद चौकसे यांनाही खंत होती. याबाबत आनंद चौकसे यांनाही चिंता होती. त्यामुळे ही संधी मिळताच त्यांनी पत्नीला ताजमहलसारखे घर भेटवस्तू देण्याची योजना आखली. ताजमहालसारखे घर बांधताना अनेक अडचणी आल्या, मात्र आनंदने हिंमत हारली नाही.
https://twitter.com/Sivaji_KS/status/1462705135260295168?s=20
https://twitter.com/Euro_starr/status/1462721338968141827?s=20
तब्बल तीन वर्षांच्या मेहनतीनंतर हे आलिशान घर तयार झाले. हे घर बांधण्यापूर्वी आनंद चौकसे त्यांच्या पत्नीसह ताजमहाल पाहण्यास गेले. तेथे जाऊन त्यांनी ताजमहालचा बारकाईने अभ्यास केला. यानंतर आनंद प्रकाश चौकसे यांनी हे घर बांधण्याची जबाबदारी सल्लागार अभियंता प्रवीण चौकसे यांच्याकडे सोपवली. स्वत: अभियंता प्रवीण चौकसे यांनीही आग्रा येथे जाऊन ताजमहालच्या परिसराची माहिती घेतली. घराचे क्षेत्रफळ ९०X९० आहे. मूळ रचना ६०X६० आहे. तर घुमट २९ फूट उंच आहे. घर कोरण्यासाठी बंगाल आणि इंदूर येथील कारागिरांना बोलवण्यात आले. तर राजस्थानातील मकराना येथील कारागिरांनी घराची फरशी तयार केली आहे. तसेच फर्निचर सुरत आणि मुंबईतील कारागीर बनविले आहे. आग्रा येथील कारागिरांचीही मदत घेऊन आता हे घर तयार झाले आहे. प्रकाश यांनी पत्नीसाठी ही अनोखी भेट दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
महत्वाच्या बातम्या

