Share

तुमचं सिंहासन कोणामुळे हललं हे तुम्हाला माहीती आहे; केसरकरांचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद काही नवा नाही. नारायण राणे जेव्हा संधी मिळेल तेव्हा शिवसेनेवर किंवा त्यांच्या नेत्यांवर टीका करतात. नारायण राणेंनी सावतंवाडीचे आमदार दीपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला दीपक केसरकरांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. यावरुन राणे-केसरकरांच्यातील कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळालं आहे.  सावंतवाडीमध्ये घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार टीका केली.  सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी खोचक टीका नारायण राणेंनी दीपक केसरकरांवर केली होती.

नारायण राणेंचं सिंहासन मी हलवल ती राणेंच्या मनात सल. नारायण राणेंच सिंहासन मी हलवलं याची कायम सल त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांच राजकारण चालत नाही. ते नुसतं बोलतात. कामं करत नाहीत. मी बोलून दाखवत नाही आणि ज्यावेळेला बोलतो तेव्हा काय होत हे तुम्हाला माहीत आहे. तुमचं सिंहासन कोणामुळे हललं हे तुम्हाला माहीत आहे आणि त्याचीच सल तुमच्या मनात आहे हे मला माहीत आहे, असा खोचक टोला लगावत दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

दरम्यान, मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली होती. विधानसभेत मी एक इतिहास निर्माण. मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही. अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!