🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. अमरावती हिंसाचार प्रकरण असेल, शेतकरी मोर्चा, कृषी कायदे, किंवा मग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला तर एकीकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्याचे चिघळत चाललेलं आंदोलन. या सर्व मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी सुरुच आहे. असे असतांनाच आज शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या संदर्भात आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की,’शरद पवारांसोबत परबमबीर सिंह प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही आणि त्यानुसार शरद पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांची एसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल.’
दरम्यान, महाराष्ट्रतले वातावरण कोण आणि का भडकवत आहे, या मागचा हेतू सर्वांना माहीत आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करत आहे हे आम्हाला माहीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे. जे करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवारांनी कालच्या बैठकीत काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत हे मला समजले, असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे- नारायण राणे
- ‘राज्य सरकार पाडण्यासाठी धक्के देत राहणार’, नारायण राणेंचा इशारा
- पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा जास्त काम केलं – जेपी नड्डा
- ‘जोपर्यंत संसदेत ठराव करून हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत…’, राऊतांचा इशारा
- …याचे राज्यकर्त्यांनी दररोज सिंहावलोकन करायला हवे- एन. व्ही. रमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
