🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी, पुणे शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil) यांनी एका मुलाखतीमध्ये पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले आहेत. ‘मनसे पक्षातीलच काही माझे हितचिंतक माझ्या विरोधात राजसाहेबांचे कान भरू लागले आहेत. राजकारणात स्त्रीला टार्गेट केलं जात आहे. तेच आता मनसेत माझ्यासोबत घडू लागले आहे. मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून काम करत आहे. पक्ष सोडण्याचा अजिबातच विचार नाही. पण मला या रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा हा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो’, असे मत रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे.
माझ्या ऑफिसला अजूनही दररोज १०० लोक येतात. मी आज तुमच्या समोर आहे. आतापर्यंत पक्ष सोडण्याचा कोणताही विचार केला नाही. येणाऱ्या काळात मला असंच त्रास होणार असेल. मला राजकारण बंद करावा लागेल किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला हीच लोक पर्याय शोधायला लावतील. राजकारणात महिलांना पुढे जाऊन दिले जात नाही. मनसेतही महिलांना टार्गेट केले जात आहे. याबाबत राज साहेबांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
‘मला 2017 साली मला भाजपची खुली ऑफर होती. तेव्हा मोदी लाटेत मनसेकडून हारही झाली. तरी मी पक्षातच राहिले. 2019 ला आमदारकीच तिकीट कापलं गेले तरी सुद्धा मी पक्ष बदलला नाही. पण माझे जे पक्षातील हितचिंतक आहे. तेच लोक राजसाहेबांचे कान भरतात. त्यांची नावे, डेटा माझ्याकडे आहे. मी राजकारणात आल्यापासून सगळ्या गोष्टी कायदेशीर करते. त्यांना वेळ आल्यावर दाखवून देणारच आहे. एकदा माझी तार हलली की नक्कीच नाव जाहीर करणार’, असा इशारा यावेळी रुपाली पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यावरुन रुपाली पाटील म्हणाल्या, ‘एक तर ही चर्चा आमच्या पक्षातील विरोधकांनी रंगवली आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे तीन महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यांचा मला सन्मान आणि अभिमान आहे. मी शरद पवार आणि अजितदादांना मध्यंतरी भेटले होते. त्यांना भेटणे चुकीचे नाही. अजित पवार पालकमंत्री आहेत. पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांनाच भेटणार. उद्या मी शिवसेनेच्या नेत्याला भेटल्याचा फोटो टाकल्यावर तुम्ही असच म्हणणार का? की रुपाली आता शिवसेनेत जाणार आहे, असा सवालही यावेळी रुपाली पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कट कारस्थानं झाली नसती तर आज निकाल वेगळा असता- शशिकांत शिंदे
- पत्नीला दिलेली प्रेमाची अनोखी निशानी, ज्याने पाहिले तो म्हणाला- ‘वाह ताज’!
- शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’एसटी संपाबाबत लवकरच…’
- तुमचं सिंहासन कोणामुळे हललं हे तुम्हाला माहीती आहे; केसरकरांचा पलटवार
- शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
