मुंबई : ऐन दिवाळ सणाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी करत आझाद मैदानावर राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरु केले होते. याच पार्श्वभूमीवर काल(२२ नोव्हें.) परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. तब्बल ४- साडे ४ तास चाललेल्या बैठकीतून राज्य सरकारने कोणताही मार्ग काढला नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीयमंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी शरद पवारांवर निशाणा साधता टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. माध्यमांशी संवाद साधतांना राणे म्हणाले की,’शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाहीत. ते निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का की कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकाला निर्देश द्यावेत की हा प्रश्न त्वरीत मिटवा किंवा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ. जो मार्ग अवलंबवायचा त्याबद्दल मी स्वत: पंतप्रधान मोदींशी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल आणि यातून मार्ग लवकरच काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना यातून वाचवावं एवढं मी सांगेन. तसेच राज्यामध्ये जे कोण परिवहनमंत्री आहेत, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी देखील बोलेन’, असेही राणे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एसटी संपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार’
- ‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

