🕒 1 min read
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाला, असा आरोप शिंदे समर्थकांनी करत राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या पराभवामागे मोठं कारस्थान असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेला पराभव आपण स्वीकारला असून माझ्या विजयासाठी प्रयत्न करणारे माझे नेते आणि कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार मानतो. निवडणूक म्हटलं की, जय पराजय हा आलाच मात्र ही निवडणूक मी लोकशाही मूल्यांवर लढवली याचा मला अभिमान आहे. कटकारस्थाने झाली नसती तर नक्कीच आज निकाल वेगळा दिसला असता, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/shashikantshindeofficialpage/posts/442305563923321
या पराभवाने कुणीही खचून न जाता सर्व कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करून विजयश्री खेचून आणू हा विश्वास मला आहे. कुणीही संयम ढळू न देता पक्षाबद्दल शाब्दिक किंवा कृत्यातून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न करू नये. माझं सर्व कार्यकर्त्यांवर प्रेम असलं तरी पक्ष विरोधी कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. आपण सर्व माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद, असंही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तुमचं सिंहासन कोणामुळे हललं हे तुम्हाला माहीती आहे; केसरकरांचा पलटवार
- शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे- नारायण राणे
- ‘राज्य सरकार पाडण्यासाठी धक्के देत राहणार’, नारायण राणेंचा इशारा
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
