मूंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या त्यांच्या नव्या घरात शिवतिर्थ याठीकाणी राहण्यासाठी गेले आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. हे दोघे घरातील गॅलरी उभे राहून चर्चा करताना पाहायला मिळाले. यावेळी सचिनच्या अनेक चाहत्यांनी सचिन आणि राज ठाकरेंचे फोटो, व्हिडीओ काढले.
दिवाळी सणाच्या निमित्ताने भाऊबीजेच्या शुभमुहुर्तावर राज ठाकरे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला. त्यांचं आधीचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज शेजारीच हे नवं पाच मजली घर असणार आहे. ‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांची भेट घेतली होती.
‘कृष्णकुंज’शेजारी बांधण्यात आलेल्या या 5 मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. या ठिकाणी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तसेच इतर नागरिकांना देखील याच कार्यालयात राज ठाकरे यांची भेट घेता येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आधीचं निवासस्थान आहे. त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर बांधलं आहे. राज ठाकरे 6 नोव्हेंबर रोजी आपल्या 5 मजली घरात राहायला गेले आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या घरामध्ये एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.
#SachinTendulkar #RajThackeray #Shivtirtha #ShivajiPark pic.twitter.com/BUTUiP6tFq
— Viraj B. (@VirajB1) November 22, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- …म्हणून परमबीर सिंग लपून बसले आहेत; वकिलांचा न्यायालयात युक्तीवाद
- …म्हणून देशाने गेल्या ७५ वर्षांत हवी तेवढी प्रगती केली नाही- मोहन भागवत
- मराठी चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल! देशाच्या समस्त शेतकऱ्यांना ‘अजिंक्य’ होणार समर्पित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

