Share

पराभवानंतर शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाला, असा आरोप शिंदे समर्थकांनी करत राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या पराभवामागे मोठं कारस्थान असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देत शिंदे म्हणाले की,’मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की मला ज्यांनी उभा केलं त्या पक्षाच्या कार्यालयाविरोधात जी भूमिका घेतलीय ती योग्य नाही. मी पवार साहेबांसह सर्वांची माफी मागतो. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर मी माफी मागतो. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे असं नाही होणार, मी पक्षासाठी जीव देईन, माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ नये.’

दरम्यान, मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केले. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असेही शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!