Share

नाथांच्या विटा नगरीचा स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांक; राष्ट्रपतींच्या हस्ते नगरपालिकेचा गौरव

Published On: 

🕒 1 min read

सांगली : नाथांच्या विटा नगरीने (Vita Nagar)देशात स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक(first rank) मिळवला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा नगरपालिकेने उत्तम कामगिरी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत विटा शहराने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल नवी दिल्लीतील(Dilli)) विज्ञानभवनात झालेल्या सोहळय़ात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind)यांच्या हस्ते विटा नगरपालिकेचा गौरव करण्यात आला आहे.

नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील(Pratibhatai Patil) माजी नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर अ‍ॅड. वैभव पाटील(Vaibhav patil), मुख्याधिकारी अतुल पाटील, स्वच्छतासेविका शांताबाई हत्तीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विटा शहराने कचराक्त शहर व हागणदारीयुक्त शहर ओडीए प्लस प्लस नामांकने मिळवली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशातील ४३२० शहरांनी सहभाग नोंदविला आहे. यातून सांगलीमधील नाथांच्या विटा नगरीने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहर स्वच्छता, रहिवासी व्यापारी व सार्वजनिक भागाची स्वच्छता, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना व नागरिकांचा सहभाग व जनजागृती, १०० टक्के कचरा वर्गीकरण, प्रोसेसिंग, नाले तलाव व्यवस्थापन व स्वच्छता अशा अनेक स्वच्छताविषयक घटकांचा समावेश केला जातो. विटा शहराने स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती केली.दर बुधवारी व शनिवारी बाटली, दूध पिशव्या यासारखा प्लॅस्टिक कचरा जमा करण्याची स्पर्धा ठेवण्यात आली. कॉलनी, भाजी बाजार या ठिकाणी तयार होणारा कचरा जागेवरच नष्ट करता येउ शकतो, यापासून झाडांना सेंद्रिय खत उपलब्ध होऊ शकते याची जाणीव लोकांना करून देण्यात आली.अशाप्रकारे विटा शहर स्वच्छतेमध्ये देशात पहिले ठरले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!