Share

सरकारची ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरल्याने रुग्णांचे मृत्यू – प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल(१३ नोव्हें.)जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या अतिदक्षता विभागास भेट दिली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली तसेच तारकपूर आगारात जाऊन संपावरील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर दरेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलत असतांना दरेकर म्हणाले की,’राज्यातील अनेक ठिकाणच्या सरकारी रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या. त्यामधून सुमारे शंभरावर रुग्णांचे बळी गेले. मात्र राज्य सरकार रुग्णालयात आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याची केवळ घोषणा करत आहे. सरकारची ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरल्याने रुग्णांचे मृत्यू ओढावले, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांवरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचे बकरे बनवू नका.’ तसेच रुग्णालयातील आगीत ज्यांनी जीव वाचवला त्यांच्याच विरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना बळीचे बकरे बनवले जात आहे, मात्र जिल्हा शल्य चिकित्सक, बांधकाम विभाग, वीज विभाग, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोकळे सोडले आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? महाराष्ट्रात रुग्णालयात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. परंतु सरकार बेफिकीरीने वागत आहे. सरकारच्या बेफिकिरीचेच हे बळी आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’महामंडळ कर्मचाऱ्यांच्या कोल्हापूर अधिवेशनात मुख्यमंत्री व शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे भत्ते, राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचे आश्वासन दिले होते. पवार यांनी शब्द पाळावा. परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी घ्यावी. आम्ही उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी घेऊ, बैठक बोलवा, देवेंद्र फडणवीस व मलाही बोलवा. आम्ही एसटी महामंडळाला फायद्यात कसे आणता येईल याबाबत सूचना करू. गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यात ३९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु परिवहनमंत्री आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची आसवे पुसण्यास गेले नाहीत. उलट भाजप चिथावणी देत असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाचे कर्मचारी हे लहान बाळ आहेत का? त्यांना स्वत:चा मेंदू नाही का, परंतु राज्य सरकार पळ काढत आहे, इतर राजकीय पक्षांची विश्वासार्हता संपल्याने कर्मचारी त्यांना चर्चेसाठी बोलवत नाहीत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!