🕒 1 min read
मुंबई: त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या अफवांचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम धर्मीयांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. या विरोधात रझा अकादमी आक्रमक झाली असून भिवंडीत रझा अकादमीचे अध्यक्ष शकील रजा यांनी भिवंडी बंदचे आवाहन केल्याने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यां मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच औरंगाबाद शहरामध्येही बंद पुकारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या सर्व हिंसाचार आणि दंगलींमागे ही दहशतवादी संघटना रझा अकादमीचा हात आहे. प्रत्येक वेळी ते व्यत्यय आणतात आणि सर्व नियम मोडतात आणि सरकार बसते आणि पाहते. एकतर सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना संपवावे लागेल. असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
This terrorist organisation Raza academy is behind all the violonce and riots in different parts of Maharashtra!
Every time they disrupt n break all the rules n Gov sits and watches..
Either the Gov bans them or we have to finish them in the interest of Maharashtra!— Nitesh Rane (@NiteshNRane) November 13, 2021
दरम्यान भिवंडी शहरातील दिवाणशाह दर्गा रोड, शास्त्रीनगर कल्याण रोड, शांतीनगर, गैबिनगर, नवीबस्ती, वंजारपाट्टी नाका, मिल्लत नगर , वंजारपट्टी नाका, समदनगर , पटेल कंपाऊंड, फातमानगर, नुरीनगर नगर, अवचित पाडा रोड अशा विविध भागात बंदचा प्रभाव जाणवला असून या भागातील दुकान, आस्थापने बंद ठेवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

