Share

एसटी संपाचे स्टेटस ठेवल्याने पुण्यातील ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Published On: 

🕒 1 min read

दौंड : एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालले असून राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यातच आता पुण्यातील ८ कर्मचाऱ्यांवर संपासंदर्भात व्हॉटसअॅप स्टेटस ठेवल्याने कारवाई केली आहे. संप काळात व्हॉट्सअप ग्रुप व अन्य प्रसिध्दी माध्यमांद्वारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत दौंड एसटी आगारातील आठ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी दौंड एसटी आगारातील १६३ कर्मचारी ८ नोव्हेंबर पासून संपात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, यांपैकी ५ चालक व ३ वाहक, असे एकूण ८ कर्मचार्यांना ११ नोव्हेंबर रोजी एका आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत. निलंबनाच्या आदेशात कामावर गैरहजर राहणे, इतर कर्मचार्यांना कामावर जाण्यास मज्जाव करणे, व्हॉट्सअप ग्रुप व इतर प्रसिध्दी माध्यमांतून चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!