Share

‘होय, आम्ही कामगारांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारतो, तुम्ही राजीनामा देणार का?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यावर अनिल परब यांनी म्हटलं होतं की, हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू होतोय. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परब म्हणाले होते. ‘कुणाच्याही भाषणबाजीला बळी पडू नका. नुकसान होऊ देऊ नका, कारण भडकवणारे नेते आपल्याला पगार देणार नाहीत, त्यामुळं कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं आवाहन अनिल परब यांनी केले होते. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहे का?, असा सवालही अनिल परब यांनी होता.

यावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परब यांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘होय आम्ही जबाबदारी स्वीकारतो, तुम्ही परिवहन वसुली मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? असा सवाल खोत यांनी विचारला आहे.

दरम्यान, गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. कालपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. गोपीचंद पडळकर आणि दाभाऊ खोत यांनीही आझाद मैदानात जोरदार आंदोलन केलं. या दोन्ही नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत अख्खी रात्रं आझाद मैदानात घालवली. कडाक्याची थंडी आणि मच्छरांचा त्रास सहन करत या दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानात संपूर्ण रात्रं जागून काढली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!