Share

सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

 नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून 350 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपावर कर्मचारी ठाम आहेत. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील आहे. हे आंदोलन चिघळू नये असं आम्हाला पण वाटतं. पण राज्य सरकार हे केवळ दमळशाहीच्या जोरावर दाबून आणि लोकांवर वेगवेगळी कारवाई करुन हे आंदोलन आणखी चिरडण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन आणखी वाढेल.

चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. काहीना काही दिलासा कर्मचाऱ्यांना राज्याने दिल्या पाहिजेत. इतक्या आत्महत्या झाल्या तरीही राज्य सरकार जाग होणार नसेल तर हे चूकीचं आहे. आम्ही सरकारला पाहिजे तेवढं सहकार्य करु पण सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!