🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून 350 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.
राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी गोपिचंद पडळकर आणि किरीट सोमय्यादेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना मंत्रालय परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
भाजपच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी मोर्चासाठी मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
Myself and Gopichand Padalkar are arrested by Police, while going to Mantralaya for ST Workers pic.twitter.com/uNPUiwnv6Q
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 10, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
- एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब
- मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मुन्ना यादवची प्रतिक्रिया
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

