🕒 1 min read
नवी-दिल्ली : येत्या विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची पूर्वतयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज(७ नोव्हें.)दिल्लीत होत आहे. या बैठकीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे उपस्थित असून नड्डा आणि मोदी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार कोरोनाकाळात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभाही घेण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने बैठकीचा समारोप होणार आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत असलेले केंद्रीय मंत्री आणि सदस्य प्रत्यक्षात हजर होणार आहेत. इतर सदस्य व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीला उपस्थित राहतील.
Delhi | BJP National Executive Committee meeting begins with veteran leaders LK Advani and Murli Manohar Joshi attending it virtually. Party president JP Nadda delivers his address to the party leaders. pic.twitter.com/V4C3H5I5ty
— ANI (@ANI) November 7, 2021
दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी है तो मुमकिन है, हे अशा वेळी खरं वाटतं’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्याने आरोपच नाकारले; राऊतांचं ‘रोखठोक’ भाष्य
- …या कैचीतच महाराष्ट्राचा विरोधी पक्ष अडकून पडलाय- संजय राऊत
- ‘अशाने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढतोय’
- ‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा’, संदीप देशपांडेंनी पोस्ट केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
