Share

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, परंतु एका जागेसाठी होणार चर्चेअंती निर्णय

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : काल(६ नोव्हें.)जिल्हा बँक संचालक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. बैठकीत जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, काँग्रेस ३ अशा जागा लढणार आहेत. महिला राखीवमधून एका जागेची काँग्रेसची मागणी आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या या मागणीवर चर्चेअंती निर्णय होणार आहे.

काँगेस पक्षाला तीन जागा देण्यात आल्या असल्या तरी अजून एका जागेची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. महिला राखीवमधून त्यांनी धरणगाव येथील काँग्रेस नेते डी. जी. पाटील यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. परंतु, अजून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यन, या बैठकीत शिवसेना तर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी तर्फे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेस तर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!