🕒 1 min read
अहमदनगर : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विभागात कोरोनाबाधित 17 रुग्ण उपचार घेत होते. दरम्यान, या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही अहमदनगर दुर्घटनेची पाहणी केली.
या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असं भारती पवार म्हणाल्या आहेत. ऐन दिवाळीत संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागालाच ही आग लागली. शॉटसर्किमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची घटना समजताच घटनास्थळी जाऊन घडलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. घडलेली दुर्घटना ही अत्यंत हृदयद्रावक असून यामध्ये कोरोनाशी झुंज देत असलेल्या ११ निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागला. ६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
(1/2) pic.twitter.com/Ag86ze8DBj— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) November 6, 2021
या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.@PMOIndia @mansukhmandviya @AmitShah @Dev_Fadnavis
(2/2)
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) November 6, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना एकुण ७ लाखांची मदत मिळणार आहे. भारती पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. तसेच या प्रकरणावरून आपण केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बातचीत केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नारायण राणेंनी मिळालेल्या खात्यात आपला परफॉर्मन्स दाखवला नाही तर मंत्रिपद जाईल’
- केजरीवाल सरकारची मोठी घोषणा ; मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
