🕒 1 min read
मुंबई : बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही राज्य सरकारांनी देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात महाराष्ट्रात असा निर्णय कधी होणार? या प्रश्नावर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना इंधनदर कपातीवर पवारांनी भाष्य केले. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल’, असे पवार म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर उत्तर देत पलटवार केला. ते म्हणाले की,’मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेच आहे. गेल्या वर्षीही मिळाली, या वर्षीही मिळणार आहे. ती कुठेच जात नाही. पण केंद्रानं ५ रुपये कर कमी केला की आपोआप ७ रुपये टॅक्स कमी होतो. आमचं म्हणणंय तो १०-१२ रुपये करा ना’, असे यावेळी फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला देशातून हटवा अन् पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा- नाना पटोले
- पुतळ्या उभारण्याआधीच सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवाद
- समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; बनावट प्रमाणपत्रे दावून नोकरी बळकावल्याची भीम आर्मीची तक्रार
- ‘शिवसेनेनं एक निवडणूक काय जिंकली, लगेच पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहायला लागलीय
- त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत- प्रसाद लाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
