Share

भाजपला देशातून हटवा अन् पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा- नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारलाही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. यावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या मागणी नंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपला देशातून हटवा आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, असं जनतेला आवाहन करत नाना पटोलेनी भाजपला हटवण्याचं वक्तव्य केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/1456262026485919746?s=20

देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी झाले. तसेच जर भाजपचा पूर्ण पराभव झाला, तर पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!